🕒 1 min read
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुआने ओलिवियर (Duanne Olivier) भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना कोरोना झाल्यामुळे खेळू शकला नाही. पण दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओलिवियरला पहिल्या कसोटीत खेळायचे होते, परंतु काही आठवड्यांपूर्वी त्याला कोरोना झाल्यामुळे त्याच्या फिटनेसवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेनसनने कसोटी पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने स्पष्ट केले कि, डुआने ओलिवियर आता निरोगी आहे पण काही आठवड्यांपूर्वी त्याला कोरोना झाला होता. त्यामुळे तो आयसोलेशनमध्ये होता आणि त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने पुरेसा सराव केला नाही. ओलिवियने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यात 48 बळी घेतले आहेत. त्याने या वर्षात आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28 बळी घेत चांगली कामगिरी केली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी, ओलिवियला संघादरम्यान खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात स्नायूंच्या ताणामुळे अस्वस्थ वाटत होते आणि त्यामुळे निवडकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सध्या सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- “अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तत्काळ अटक करा”, चित्रा वाघ आक्रमक
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत


