Share

देहू मध्ये बीज सोहळा पार पडणारच, जी कारवाई करायची असेल ती करावी; वारकरी संप्रदाय आक्रमक

Published On: 

सातारा : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामुळे राज्यभरात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेनंतर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी देखील भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी आहे.

दरम्यान, ‘कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत आहे. त्यामुळे पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे,’ असं आवाहन वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘कोरोनाच प्रसार वाढत नाही तर तसं भासवलं जातंय. सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो. केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत. आता, देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी. सरकारची चाकोरी तोडून आम्ही सर्व वारकरी जमणार आहोत. देहू आणि पैठणची यात्रा भरली पाहिजे, याबाबत आम्ही ठाम आहोत,’ असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!