Share

बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी

Published On: 

मुंबई : बीड जिल्हा राजकारणासाठी तसेच गुन्ह्यांसाठी ओळखला जातो. मात्र, बीड जिल्ह्यातील कृषी विम्याचा पॅटर्न आता राज्यात राबवला जाणार आहे. यामुळे शेतऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा कृषीमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. कृषीमंत्र्यांनी खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली, यामध्ये भुसे यांनी ही घोषणा केली आहे.

बीड जिल्ह्यात समजा शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमचे १०० कोटी रुपये गोळा झाले. तर त्याचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात येते. यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानीपोटी समजा ५० कोटी वितरित करावे लागले. अशा परिस्थितीत कंपनीला ५० कोटी न देता यातील २० कोटी रुपयेच दिले जातात. यातही १० कोटी कंपनीचा खर्च म्हणून तर १० कोटी नफा म्हणून दिले जातात. तर उर्वरीत ३० कोटी रुपये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये वाटप केले जातात.

या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होतो आणि विमा कंपनीच्या अनिर्बंध उत्पन्नावरही अंकूश राहते. अशीच योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!