🕒 1 min read
बीड: अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६० किलोमीटर अंतरावर बुधवारी बारा डब्यांची रेल्वेची चाचणी घेण्यात आली. दुपारी ४ वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांच्या हस्ते पुजन करुन हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावली. सोलापूरवाडी ते आष्टी या अंतरावर पहिल्यांदा हाय स्पीड रेल्वे धावणार असल्याने बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसून आले. रेल्वे बीड-परळी पर्यंत कधी धावणार अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाला १९९५ साली मान्यता मिळाली होती. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षिरसागर, दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे, खासदार रजनी पाटील, खा. प्रीतम मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने रेल्वेच्या कामाने गती घेतली. त्यामुळे अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले. अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी हाय स्पीड रेल्वे १२ डब्यांसह धावली.
आपल स्वप्न,आपला हक्क !
आपली परळी-बीड-नगर रेल्वे!!Thank you @narendramodi ji &@Dev_Fadnavis ji @Pankajamunde Tai @SMungantiwar @PiyushGoyal @sureshpprabhu ji @nsitharaman ji For your contribution !! pic.twitter.com/8XpVsWethI
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) December 29, 2021
आष्टी येथील रेल्वे स्थानकात रेल्वे पाहण्यासाठी सकाळ पासून लहान लहान-थोरांसह नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. नागरिकांना हटविण्यासाठी रेल्वे स्थानकातील अधिकारी व कर्मचार्यांना कसरत करावी लागली. आष्टीतील नागरिकांनी हार फुलांनी रेल्वेची आकर्षक सजावट केली व स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो प्रत्यक्ष दर्शी लावला व मुंडे अमर रहे अशा घोषणा दिल्या. अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी पुन्हा ९० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याने राज्य सरकारचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.
हत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतातही नसीरुद्दीन सारख्या…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- बुमराहचा खतरनाक यॉर्कर! भारतीय गोलंदाजाचा व्हिडिओ व्हायरल
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

