🕒 1 min read
नवी दिल्ली: दिल्लीतील ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. दरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पिडीतेच्या आई-वडिलांचा फोटो पोस्ट केल्याकारणाने ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विट काढून टाकले. तसेच त्यांचे ट्विट खातेदेखील बंद करण्यात आले. याच प्रकरणावर ट्विटरने आपले स्पष्टीकरण दिले आहे.
ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केले. हे आमच्या धोरणाविरूद्ध असल्याने आम्ही ते ट्विट डिलिट केले असल्याची माहिती ट्विटरकडून न्यायालयात दिली आली आहे.
मुख्यन्यायाधीश धीरूभाई नारनभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बुधवारी कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हादलेकर यांच्या याचिकेवर सुनावणी दिली. ज्यामध्ये राहुल गांधींविरोधात बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७४ आणि कलम २३ (२) बाल प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आलेली होती. यावेळी न्यायालयाने हा अतिशय जबाबदारपणा आहे, तुम्ही तत्परता दाखवली आहे. असे मत व्यक्त केले आहे. तर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी यावर आक्षेप घेत ट्विटरने प्रतिज्ञापत्र दाखल करावे आणि फोटो कधी काढला ते सांगावे.असे म्हटले आहे. दरम्यान यावर २७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात ; आयसीसी क्रमवारीत घसरण
- ‘व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर’, ‘यामुळे’रात्रभर झोपू शकले नाही
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
