परभणी: जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात आरोग्य कार्यालयात दोन्ही पायाने दिव्यांग आरोग्य सहाय्यकास दोघांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. या दोघांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारची सुट्टी असल्याने दिव्यांग आरोग्य सहाय्यक भारत नरवाडे हे घरी होते, मात्र डॉ. शिंदे यांना अॅन्टीजन किट हवे असल्याने आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार यांनी नरवाडे यांना कार्यालयात जायला सांगितले. नरवाडे कार्यालयात जाऊन बसले तेव्हा दोनच्या सुमारास तिथे डॉ. शिंदे यांचे पती व त्यांचा ड्रायव्हर अॅन्टीजन किट नेण्यासाठी आले. त्यांनी तोंडाला मास्क लावला नसल्याने नरवाडे यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितले, असे म्हणताच त्या दोघांनी दोन्ही पायाने दिव्यांग आरोग्य सहाय्यक भारत नरवाडे यांना खाली पाडून बेदम मारहाण करायला सुरुवात केली.
आरोग्य सहाय्यक नरवाडे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात पोलिसांनी त्या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच; सुप्रिया सुळेंचा विश्वास
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड
- पाणी पिण्यासाठी मास्क काढलेल्या पत्रकाराला पोलीसांची शिवीगाळ
- पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके नक्की विजय होतील; जयंत पाटलांचा दावा
- भर उन्हात ममतादीदींचा प्रचार जोमात, भाजप कोमात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

