परभणी : मानवत तालुक्यातील इटाळी येथील एका व्यक्तीने दारूसाठी माहेरून पैसे आण म्हणत पत्नीला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
इटाळी येथील कांचन आसाराम गोडसे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, पती आसाराम गोडसेला दारूचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तिला त्रास देत होता. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आसारामने दारु पिन्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसै घेऊन ये असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी त्याने कोयत्याने तिच्या शरिरावर अनेक ठिकाणी वार केले. त्यामुळे ती जखमी झाली. या प्रकरणी आरोपी आसाराम गोडसे याच्याविरुद्ध ३ मार्चरोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

