Share

सावधान ! राज्याच्या ‘या’ भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Published On: 

नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा पाऊस जोरदार कमबॅक करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूर येऊ शकतो. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मध्यम धरण प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये देखील सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन केलं आहे. धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस आणि आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवक्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता, दरवाजे असणाऱ्या मोठ्या धरणाचे वक्र दरवाजे कधीही उघडण्यात येवू शकतात. तर दरवाजे नसणाऱ्या धरणातील पाणीसाठा 100 टक्के पेक्षा जास्त झाल्यावर नदी/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार आहे.

त्यामुळे करीता नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसंच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना आणि नदी पात्रातून आवागमण करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!