जिनिव्हा : २०१९ च्या अखेरीस कोरोना व्हायरसचे विविध देशांमध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. यानंतर २०२० च्या फेब्रुवारीनंतर जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. यानंतर, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेहून दुसऱ्या लाटेमुळे अधिक मनुष्यहानी झाली. देशात सध्या दुसऱ्या लाटेची स्थिती आटोक्यात येत असतानाच जगभरातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता.
संभाव्य तिसऱ्या लातेबाबत अनेक निष्कर्ष आणि नेमकी कधी ही लाट येईल याबाबत तर्क लावले जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) मोठा खुलासा केला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, असं सांगत सर्व देशांना अलर्ट केलं आहे. यामुळे वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन सर्व देशांना करण्यात आलं असून अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.
डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरस सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आहे. सोबतच तो अधिक संसर्गजन्यही होतो आहे. डेल्टा व्हेरिएंट आता 111 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. लवकरच हा जगभर पसरू शकतो. अल्फा व्हेरिएंट 178 देशांत आहे. तर बिटा आणि गामा व्हेरिएंट अनुक्रमे 123 आणि 75 देशांमध्ये दिसून आला आहे.
कोरोना रोगाने सर्वाधिक आर्थिक फटका हा भारताला बसला आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या धोक्याने अधिक मनुष्यहानी होण्यासह इतर परिणाम हे भयंकर असल्याचे वर्तवले जात आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून तिसरी लाट थोपवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण व काटेकोर नियम यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आल्याचे उदाहरण असल्याने भारतात देखील लसीकरण व योग्य खबरदारी घेतल्यास स्थिती आटोक्यात राहील.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


