🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून मुंबईत जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मुंबईत मागील 4-5 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईत उद्या आणि परवा म्हणजेच 13 आणि 14 जूनला मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. तसेच परिसरातील नागरिकांनी उद्या आणि परवा अशी दोन दिवस घरातच राहावं. तसेच लांबचा प्रवास टाळावा अशा सुचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे, मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत?’ ; मेटेंचा घणाघात
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
