बुलडाणा : ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यासोबतच चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यानंतर आता आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्वीप्रमाणे म्हणजे १०० टक्के लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे पत्र गायकवाड यांनी ठाकरे यांना लिहिले आहे. या लॉकडाऊनमध्ये नागरिक कुठल्याही प्रकारे नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. बाजारात गर्दी दिसून येत आहे.
अनेक व्यापारी आपल्या दुकानाच्या मागच्या दाराने उघडे ठेवून माल विकत आहे, रस्त्यावर नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटणे शक्य नाही. उलट कोरोनाच्या रूग्णात वाढ होताना दिसून येत आहे. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास किराणा आणि दूध डेअरी सुरू ठेवावी. याशिवाय कुठल्याही प्रकारची दुकाने उघडी ठेवू नये.
स्मशानभूमित प्रेत जाळण्याकरिता जागा नाही. रेमडिसिवरचा तुटवडा भासत आहे, ऑक्सिजन मिळत नाही. आजच याला कडक लॉकडाऊन करून आळा नाही घातला तर याहीपेक्षा भयावह परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याकरीता १०० टक्के लॉकडाऊन करावे अशी विनंती आ. संजय गायकवाड यांनी आपल्या पत्राव्दारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंजाबचा नादच खुळा!, अर्शदीप सिंगने केला ‘गब्बर’च्या स्टाईलमध्ये जल्लोश
- आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल
- कृउबास सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक
- ‘गोकुळ’च्या निवडणुकांवर कोरोनाच सावट; निवडणुकीचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात !
- आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने केली पहिल्यांदा ‘अशी’ हॅटट्रिक


