🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाने पंजाब किंग्सच्या संघाचा ६ गडी राखुन दणदणीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्सने दिलेले १९६ धावांचे कठिण लक्ष्य चार गडी गमावत १९व्या षटकातच पार केले. धावांचा पाठलाग करताना ९२ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या लढतीत दिल्लीच्या सलमीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करुन दिली होती. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पाच षटकातच अर्धशतकी सलामी दिली. यादरम्यान पृथ्वी शॉने १७ चेंडुत ३ चौकार आणि २ षटकारासह छोटेखानी वादळी खेळी केली. डावातील अर्शदीप सिंग टाकत असलेल्या सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडुवर पृथ्वी शॉ ख्रिस गेल्या हातात झेल देत बाद झाला. शॉ बाद होताच अर्शदीप सिंगने त्यावेळी खेळपट्टीवर दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या शिखर धवनकडे बघत खास ‘गब्बर’ स्टाईल मध्ये जल्लोष केला.
https://twitter.com/lodulalit001/status/1383819980932665355
त्याच्या या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिखर धवन आयपीएल तसेच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा झेल घेतो त्यावेळी ‘थाय-फाईव्ह’ म्हणजे मांडीवर थाप टाकत आपल्या मीशीवर ताव देतो. शिखर धवनचे हे सेलिब्रेशन चांगलेच लोकप्रिय आहे. मात्र या सामन्यात अर्शदीपला पुन्हा जल्लोषाची संधी मिळाली नाही. अर्शदीपने सामन्यात ३ षटके गोलंदाजी करत २२ धावा देत पृथ्वीची एकमेव विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या
- ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही’
- “कोरोना काळात कुंभमेळा व्हायलाच नको होता”
- केज येथील कोविड सेंटरमध्ये वेळेवर जेवण मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
- पॉईंटमॅनच्या प्रसंगावधानाने वाचला चिमुकल्याचा प्राण; पहा थरारक व्हिडीओ !
- ‘बर्थडे’ला नाराज झाला केएल राहुल, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

