Share

सावधान! औरंगाबादच्या उड्डाणपूलांवर डांबराचे अधिक थर; मधोमध मोठी भेग, पूल कधीही कोसळण्याची शक्यता!

Published On: 

औरंगाबादः औरंगाबाद प्रशासन पुल कोसळण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला आहे. शहरातील उड्डाणपूलांवर डांबराचे अधिक थर असल्याने पूल कधीही कोसळू शकतो. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शहरातील उड्डाणपुलांवर गरजेपेक्षा जास्त डांबराचे थर टाकण्यात आल्यामुळे पुलांवरील ओझे वाढले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला फटकारले आहे. तज्ज्ञांनुसार पुलावरील डांबराचा थर ६५ मीमी एवढाच असावा. तसेच दुसरा थर टाकण्यापूर्वी पहिला थर पूर्णपणे काढून टाकावा. उड्डाणपुलांवर थरावर थर टाकण्यास मंजुरी देऊ नये. मात्र शहरातील महावीर चौकातील उड्डाणपुलावर ७२ मिमी एवढा थर आहे. मोंढानाका उड्डाणपुलावर तो ११३ मिमी एवढा आहे. जळगाव टी पॉइंट पुलाचा थर ७२ तर रेल्वे स्टेशन पुलाचा थर ९९ मिमी आहे.

याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल १० फेब्रुवरीपर्यंत शपथपत्रासह सादर करण्याचे आदेश तज्ज्ञांच्या समितीला दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे क्रांती चौक उड्डाणपुलाच्या मधोमध मोठी भेग पडली आहे. त्यावरून सुसाट वाहने धावत असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. ही भेग ‘एक्सपान्शन जॉइंट’ असेल तर पुलास काही धोका नसून, डांबराच्या साह्याने भेग बुजविता येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, या ठिकाणी ‘एक्सपांशन जॉइंट’ नसेल तर पुलास धोका होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी दिले ऑडिटिंगचे आदेश

क्रांती चौकसह शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.३) दिले. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल येत्या १० दिवसांत देण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. रस्ते विकास महामंडळाने क्रांती चौक व सेव्हन हिल उड्डाणपुलांचे यापूर्वीच मनपाकडे हस्तांतरण केले आहे. मोंढा नाका, सिडको आणि महावीर चौक येथील पुलांचे हस्तांतरण अद्याप बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!