🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढत्या परिणामामुळे अनेकांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन, त्यामुळे आलेली बेरोजगारी याचाही समाजव्यवस्थेवरही वाईट परिणाम झालेला आहे. या काळात जिल्हयात बालविवाहाचे प्रमाणही वाढत असुन एकुण ५२ बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने थांबवले आहेत. यात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आश्रय, समुपदेशन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तथा अध्यक्ष जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे बालविवाह बाबतीत कार्यवाही करण्यातच्या सुचना आहेत. याअंतर्गत बाल कल्याण समिती, पोलीस उपनिरिक्षक, पोलीस अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बालविाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्राम बालसंरक्षण समिती इत्यादींना आदेशित केलेले आहे. तसेच अक्षय तृतीया मुहुर्तावर राज्यात बालविवाह होणार नाहीत यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवुन कार्यवाही करण्याचे आदेशीत केलेले आहे.
या अंतर्गत जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ पथक गठीत करून पोलीसांच्या मदतीने घटनास्थळावर जावुन संबंधीत बालविवाह थांबवुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन बाल कल्याण समितीसमक्ष पुढील बालिकेचे पुनवर्सनला करिता सादर करण्यात येते. ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन ग्रामसेवक आणि सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन हे बालविकास प्रकल्प अधिकारी हे २०१६ च्या शासनाच्या अधिसुचनेत निर्देशित केलेले आहेत.
लॉकडाऊन कालावधीत जिल्हयातील ५२ बालविवाह थांबविण्यात आले आहेत. यात पैठण १३, सिल्लेाड ८, वैजापुर १, गंगापुर ८, कन्नड ३, फुलंब्री ७, खुल्ताबाद १, औरंगाबाद १६, सोयगाव १ असे एकुण ५२ विवाहांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्हयातील अशा बालविवाहांवर करडी नजर ठेवुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांचे नेतृत्वातील पथक सक्रिय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा; बदलीला स्थगिती
- कोरोना अलर्ट! ‘लातूर शहरात ऑक्सिजन तसेच व्हेंन्टिलेटर बेडची संख्या वाढवा’, अमित देशमुखांच्या सूचना
- ‘औरंगाबादेत फक्त हिंदूबहुल भागातच कारवाई, ‘विशिष्ट’ लोकांना सुट’, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
- अमितकुमारांनी ही गोष्ट आधी सांगितली असती तर आम्ही सुधारणा केली असती – आदित्य नारायण
- ‘माझ्या देशातील लोक मरत असताना, मी आता लग्न करणार नाही’; ‘या’ अभिनेत्रीने घेतला निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

