Share

अमितकुमारांनी ही गोष्ट आधी सांगितली असती तर आम्ही सुधारणा केली असती – आदित्य नारायण

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे राज्यात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे चित्रिकरणावर बंदी लादण्यात आली. त्यानंतर अनेक मालिका, टीव्ही शो चित्रीकरणसाठी दुसऱ्या राज्यात गेले. सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल हा रियालिटी शो चे चित्रकरण देखील दमणमध्ये सुरू होते. या शोमध्ये असलेल्या गायकांनी त्यांच्या आवाजाची जादू रसिक प्रेक्षकांच्या मनावर केली आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज कलालकर पाहुणे म्हणून येतात. यावेळी या शोमध्ये किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार आले. मात्र यावेळी या शोची एक वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरू झाली आहे.

किशोरकुमार यांना ‘इंडियन आयडॉल’च्या एका एपिसोडमधून आदरांजली वाहण्यात येणार होती. शोमधल्या सगळ्या गायकांनी किशोरकुमार यांची गाणी सादर केली. हा एपिसोड शूट झाल्यानंतर अमितकुमार यांनी या झालेल्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मुलांनी ज्या प्रकारे गाणी गायली त्याने अमितकुमार यांचं समाधान झालं नसल्याचे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल आणि यामुळे एकच चर्चा सुरू झाली.

अमितकुमार यांच्या या वक्तव्यावर आदित्य नारायण पुढे येत आपल मत व्यक्त करत म्हणाला की, अमितकुमार यांची नाराजी मला कळली आहे. पण त्यांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. हे शूट सध्या दमणमध्ये चालू असून तिथे मर्यादित माणसं आहेत. सगळी परिस्थितीच वेगळी आहे. तरीही त्यातून आम्ही उत्कृष्ट तेच द्यायचा प्रयत्न करतो आहोत. अमितकुमार यापूर्वी एक दोन वेळा आमच्या सेटवर आले आहेत. या मंचावर येऊन त्यांनी किशोरदांचे काही अनुभव शेअर केले. तेव्हा जर त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर आम्ही आणखी सुधारणा करू शकलो असतो.’ असे आदिय नारायण याने अमित कुमार यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!