मुंबई :सध्या देशात कोरोना काळात देखील मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी विवाह करत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील वैशाली टक्करचा देखील यावर्षी विवाह होणार होता. मात्र देशात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या संकटाचा विचार करून तिने तिचे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अभिनेत्री वैशाली टक्कर म्हणाली की, ‘सध्याचे परिस्थिती पाहता मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. मी अशा वातावरणात लग्न कसे करु शकते, जेव्हा लोक दररोज मरत आहेत, ते अस्वस्थ आहेत. यावर्षी मला नवं आयुष्य सुरू करावंस वाटत नाही आहे. यावर्षी माझे लग्न होणार नाही. सध्या भारत सर्वाधिक प्रभावित आहे आणि मी उत्सव, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्या देशात, जेव्हा आजूबाजूचे लोक पीडित आहेत आणि मरत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.’ वैशाली टक्करने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकजण कौतुक करत आहेत.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. वैदयकीय सुविधांच्या अभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. अशात मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तिंकडून मिळणारी ही मदत लाखमोलाची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

