Share

इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा; बदलीला स्थगिती

Published On: 

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असणाऱ्या दया नायक यांची बदली करण्यात आली होती. नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होते. एटीएसमध्ये दया नायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर आता नायक यांची बदली गोंदियामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकपदी करण्यात आली होती.

परंतु आता त्यांच्या बदलीला मॅट ने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दया नायक यांची मुंबईतून करण्यात आलेल्या बदलीला मॅटने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दया नायक हे आपल्या मुंबईतील पदावर कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. तसेच मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ज्या एटीएस टीम्स करत होत्या त्यापैकी जुहू एटीएस टीमचे नेत्रृत्व हे दया नायक करत होते. यानंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यातच दया नायक यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले. या तडकाफडकी बदलीने चर्चांना उधाण आले होते.

मात्र, दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत होते. २०१४ मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली होती. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर २०१६ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलं. सप्टेंबर २०१९ मध्ये दया नायक यांची मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!