मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळानंतर आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबतची ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदेजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरचं मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका”
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
यापूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावाला होता. राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले कि, “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वतःच कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो.”
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे राजभवनात पोहोचले. येथे त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच २९ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सर्वांनाच चकित केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

