मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -14 चा दुसरा भाग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये खेळला जाईल. अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्याची शक्यता नाही. यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील खेळाडूंचा देखील समावेश आहे. मात्र, परदेशी खेळाडूंना उर्वरित मोसमात खेळण्यासाठी बीसीसीआय तयार करेल, असा फ्रेंचायझींना विश्वास आहे.
बीसीसीआयने आम्हाला शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयपीएलचे उर्वरित मोसम युएईमध्ये पार अशी माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयचे अधिकारी सध्या युएईमध्ये असून त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी संवाद साधला आहे. परदेशी खेळाडूंनाआयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी उपलब्ध करून देण्याविषयी बीसीसीआय सर्व बोर्डांशी चर्चा करणार असल्याचेही आम्हाला समजले आहे. असे एका फ्रेंचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
परदेशी खेळाडू हे प्रत्येक संघासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे काही परदेशी खेळाडू न खेळल्यास, त्यांची जागा घेऊ शकतील असे खेळाडू आम्हाला शोधावे लागतील. परंतु, बीसीसीआय इतर बोर्डांना त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवण्यासाठी तयार करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही यावेळी फ्रेंचायझींच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हंगामातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील कठोर भूमिका घेतली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले की, विदेशी खेळाडू आयपीएल -14 चे उर्वरित सामने न खेळल्यास त्यांना प्रो-रॅटच्या आधारे पैसे दिले जातील. अधिकाऱ्यांनी सांगितले की खेळाडूंचा पगार कपात करण्याचा अधिकार फ्रेंचायझीला असेल.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण


