Share

बीसीसीआयने शेअर केला टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट व्हिडीओ

Published On: 

नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या (team india)  खेळाडूंचे काही फ्लाइटचे फोटो आणि काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू फ्लाइटमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने आणि तीन वनडे मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे तर एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) असेल.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कसोटी कर्णधार विराट कोहली इशांत शर्मासोबत विनोद करताना दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि श्रेयस अय्यर एकत्र हसताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओ श्रेयश अय्यर डान्स करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी अय्यरने त्याचे काही डान्स करतानाचे व्हिडीओ देखील सोशल मिडियावर पोस्ट केले होते.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रोन उपलब्ध झाल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना केवळ एक दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवले जाणार आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंची चाचणी केली जाईल आणि निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना क्वारंटाईनमधून काढले जाईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!