मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या एक दीड वर्षापासून सर्व जनजीवन विस्खळीत झाले आहे. मात्र हळुहळु सर्व पुर्वपदावर येत आहे. मात्र स्थानीक क्रीडा स्पर्धाना हवी तशी सुरुवात अद्यापही झालेली नाही. याच पार्श्वभूमिवर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेत रणजी करंडक स्पर्धेच्या ग्रुपची घोषणा केली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेसाठी गटांची घोषणा केली आहे. यात ग्रुप ए, बी, सी, ई आणि प्लेट ग्रुपचा समावेश आहे. ग्रुप ए मध्ये गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, सर्विसेज आणि आसाम संघाचा समावेश आहे. ग्रुप बी मध्ये विदर्भ, हरियाणा, केरळ, त्रिपुरा, राजस्थान आणि मागील स्पर्धेतील उपविजेता बंगालचा समावेश आहे. तर ग्रुप सी मध्ये मुंबई, कर्नाटक, दिल्ली, हैदराबाद, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या संघाचा समावेश आहे. या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ देखील म्हणले जात आहे.
गतविजेता सौराष्ट्रला ग्रुप डीमध्ये स्थान मिळाले आहे. या ग्रुपमध्ये सौराष्ट्रसहीत तामिळनाडू, रेल्वे, जम्मु-काश्मिर आणि गोवा या संघाचा समावेश आहे. तर ग्रुप ईमध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बडोदा, ओडिसा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी संघाचा समावेश आहे. प्लेट ग्रुपमध्ये चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश संघाचा समावेश आहे.
रणजी करंडक स्पर्धेतील ग्रुप ए चे सामने मुंबईत, ग्रुप बी आणि सी चे सामने बंगळुरु येथे होतील. तर ग्रुप डीचे अहमदाबाद, ग्रुप ईचे तिरुअनंतपुरममध्ये आणि प्लेट ग्रुपचे चेन्नईमध्ये आयोजीत करण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला सामन्यापुर्वी पाच दिवस आधी विलगीकरणात राहणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक संघाला ३० सदस्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यात १० सपोर्ट स्टाफ आणि २० खेळाडू असतील. कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आव्हान बीसीसीआयसमोर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टीम इंडिया करु शकते पुनरागमन’; नासीर हुसैनचा इंग्लंडच्या संघाला निर्वाणीचा इशारा
- उस्मान ख्वाजानंतर रिकी पॉटिंग जस्टिन लँगरच्या समर्थनार्थ आला पुढे, म्हणाला…
- पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही; परबांचे ईडीला पत्र
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली


