🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही महिन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशविरुद्ध टी-२० मालिकेत पराभव स्विकारावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये अंतर्गत कलह समोर येत आहे. यात प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांच्याविषयी संघात नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग प्रशिक्षक जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत बोलताना पॉटिंग म्हणला की,’गेल्या काही आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची कामगीरी फारच निराशाजनक राहीली आहे. यादरम्यान जस्टीनबद्दल मला वाईट वाटते. वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याने बराच काळ स्वत:ला एका हॉटेलमध्ये कैद करुन ठेवले होते. यावेळी मी त्याला भेटायला गेलो होते.’ असे पॉटिंगने सांगितले.
यावेळी पॉंटिग लँगरला म्हणाला,’ ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही कर्णधार किंवा प्रशिक्षक पदावर असता तेव्हा तुम्ही जर अपयशी ठरला तर तुम्हाला टीकेचा सामना हा करावाच लागतो. त्यामुळे यावर तु वरिष्ठ खेळाडूसोबत चर्चा करावी’ असा सल्ला पॉटिंगने दिला आहे. काही दिवसापुर्वी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटून मायकल वॉनने या प्रकरणावर फेसबुक पोस्ट लिहत खुलासा केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटु उस्मान ख्वाजाने जस्टीन लँगरच्या समर्थनार्थ पुढे आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही; परबांचे ईडीला पत्र
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले


