Share

संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली

Published On: 

🕒 1 min read

 ठाणे : महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नसल्याचे वारंवार समोर येत असताना आता महिला अधिकारी देखील राज्यात सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला  आहे.

कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या नराधम फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पिंपळे या माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून पिंपळे यांच्यावर चाकूने अचानक हल्ला करण्यात आला. बचावासाठी त्यांनी हात वर केल्यावर त्यांची दोन बोटेच तुटून पडली. पिंगळे यांच्या बचावासाठी धावलेल्या अंगरक्षाचेही एक बोट तुटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!