Share

पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही; परबांचे ईडीला पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर हा संघर्ष आणखी पेटणार अशी शक्यता वर्तविली जात असताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या धडक कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित काही संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या देखील अडचणी ईडीने वाढवल्या आहेत. अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असून आज ईडी कार्यालयात हजर राहणाचे आदेश देण्यात आले होते मात्र आता परब हे या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समोर आले आहे.

अनिल परब यांनी ईडीला एक पत्र लिहिले असून या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही असं कळवलं आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही असं परब यांनी कळवलं आहे. सोबतच त्यांनी दोन आठवड्यांचा वेळ देखील ईडीकडे मागितला असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!