Share

सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज

Published On: 

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी शेवटचे २ दिवस आणि सप्टेंबर महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट रोजी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, मुंबई, पुणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

१ सप्टेंबर रोजी देखील पावसाची स्थिती चांगली राहील. आता पावसाळी हंगामाचा अखेरचा महिना असल्याने शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षाही कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!