इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.
आता या सामन्याचा पाचवा दिवस सुरु असला तरी पावसामुळे हा सामना आणखी एक दिवस खेळला जाणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारतीय संघाने पाचव्या आणि सहाव्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट करून सांगितले आहे.
Good bowling by @MdShami11 & @ImIshant backed by some terrific fielding by ????????.
Crucial runs were scored by Jamieson & Southee along with Williamson.
With around 130+ overs left in the game ???????? will have to bat well if they want to put ???????? under pressure.#WTC21 | #INDvsNZ pic.twitter.com/zpWGdziODL
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 22, 2021
ट्विट करत सचिन म्हणाला, ‘मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी उत्तम गोलंदाजी केली. भारताने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांना चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून विल्यमसनच्या साथीने जेमिसन आणि साऊथी यांनी महत्त्वाच्या धावा केल्या. या सामन्यात आता साधारण १३० षटकांचा खेळ शिल्लक असून न्यूझीलंडवर दबाव टाकण्यासाठी भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली


