🕒 1 min read
मुंबई : बारामतीचा गड उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का ? फक्त बोलायचं म्हणून बोलायचे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजप वर केला. लंके यांनी आज कल्याण उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी कल्याण मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार संवाद साधला .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक गड उध्वस्त झाले आहे. असा सूचक इशारा शरद पवार यांना दिला. तर पुढे बोलताना येत्या विधान सभा , लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विसर्जन करायचे आहे. असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबत लंके यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला. ज्या बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली राज्यात प्रत्येक झोपडी पर्यंत विकास पोचविण्याचे काम केलं, बारामतीचा गढ उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का? असा सवाल करत फक्त बोलायचं म्हणून बोलायचं , कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका लंके यांनी केली .
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारणं; तसा प्रयत्न केल्यास….; खैरेंचा शिंदेंना इशारा
- Ambadas Danave | “शिंदे गटालाच सरन्यायाधीशांनी ‘Who are you’ विचारलंय”
- “धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर…”, दसरा मेळाव्या वादात बच्चू कडूंची उडी
- Amit Shah | अमित शहा यांच्या ताफा जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेलाही अडवलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
- Jayant Patil | सेफ्ली पाॅईंटला जयंत पाटलांची सेल्फी घेताना व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
