Share

बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण ते देखील जिंकू; पवारांच्या बालेकिल्ल्यावर राऊतांचा डोळा

Published On: 

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड नंतर पुण्यात कार्यकर्ता मेळावा राऊत यांनी घेतला असून यावेळी विरोधकांवर सडकून हल्लाबोल केला. मात्र, उस्फुर्ततेच्या भरात राऊत यांनी बारामती जिंकणे देखील शिवसेनेचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. यामुळेच आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान बारामती हा राजकीय दृष्टीकोनातून पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला भेदणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असल्याचं म्हटलं जातं. पण हाच गड जिंकण्यासाठी तयारीला लागण्याची संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. बारामती हा माहाराष्ट्राचाच भाग आगे. आपण तिथे जिंकू शकतो. आपण सकारात्मक राहायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले कि, पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे, बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटलं होतं का आपण पुरंदरला जिंकू ? हा सुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो ही सकारात्मक भावना ठेवली पाहिजे,’ असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!