पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत. आज ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे देखील उपस्थित आहेत.
यावेळी विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केले तसेच विजय शिवतारे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच ललकारले आहे. पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असा इशाराच विजय शिवतारे यांनी दिला आहे. शिवतारे यांनी थेट अजितदादांना ललकारल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मावळमध्ये मी पार्थ पवार यांना पाडलं म्हणून पुरंदरमध्ये मला आव्हान देऊन पाडलं. मावळमध्ये मी श्रीरंग बारणेच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढलो. मात्र माझ्यावेळी माझ्यामागे कुणी उभं राहीलं नाही, अशी खंत देखील शिवतारेंनी व्यक्त केली आहे.
तसेच शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे वन मॅन आर्मी आहेत. त्यांच्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे, असं सांगतानाच वर आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री आपलेच आहेत. महाविकास आघाडी आपली आहे. सत्तेत येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण खाली तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसत नाही. वरती नेते एकत्र आले तरी खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच आहे. संघटनेने शिवसैनिकाला बळ द्यावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप ठाकरे सरकारचा ‘बाल बाका’ करू शकणार नाही; राऊतांचे खडेबोल
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे


