मुंबई – सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नववर्षात नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकड़े देण्यात आला आहे. सध्या ते लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत. आज दुपारी 3.30 वाजता ते अतिरिक्त कार्यभार स्विकारणार आहेत.
सुबोध जयस्वाल हे सप्टेंबर २०२२ रोजी निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी ऑक्टोबर अखेरीस अर्ज केला होता. दोन महिन्यांनी त्यावर केंद्राने निर्णय घेत जयस्वाल यांची प्रतिनियुक्ती सीआयएसएफ येथे केली. त्यामुळेच आता या पदासाठीची जागा पाहता नगराळे यांच्याकडे ताप्तुरती जबाबदारी देण्यात आली आहे.
नगराळे हे सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासुन नगराळे यांच्यासह सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश शेठ यांची नावे महासंचालक पदासाठी चर्चेत होती. अखेर आज गृह विभागाने पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार; अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा
- सिंधुताईंच्या मदर ग्लोबल फाउंडेशनला मिळणार सामाजिक न्यायच्या अनुदानित वसतिगृहाची साथ
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित केली जाणार; सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
- ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार; केंद्र सरकारशी सामजंस्य करारास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
