Share

‘संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. अशातच काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ८ महत्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांची माहिती देणारे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले होते.

यापैकी मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय खात्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये ‘संभाजीनगर’ आणि कंसात औरंगाबाद असा उल्लेख केल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर संदर्भात भूमिका ठाम असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. शिवसेनेच्या काही नेत्यांनी याचं स्वागत देखील केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावेळी देखील संभाजीनगर असं नाव मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर वापरण्यात आलं होतं. हाच उल्लेख पुन्हा झाल्याने नामकरणाच्या मुद्द्याने अधिक वेग घेतल्याचं दिसून आलं. मात्र आता ‘कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ’, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले आहे.

संभाजीनगर असा उल्लेख केल्याने समज देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी याप्रकणावर आगपाखड केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज आम्हाला माफ करा तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या ह्या पेक्षा मोठं दुर्भाग्य काही नाही. ज्या संभाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य स्वराज्यासाठी संपवलं त्यांचा आपण रोज अपमान करतोय हेदेखील शिवसेनेला भान नाही.’ असा घणाघात राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!