पुणे : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने रेस्टोरंट, बार खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर पुण्यातील हॉटेलचालकांना दिलासा मिळाला असला तरी इतर व्यावसायिकांनी मात्र दुजाभाव होत असल्याची तक्रार केली आहे. हॉटेल सुरु करताना राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती त्यानुसार, हॉटेल रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
मात्र पुणे महानगरपालिका हद्दीतील इतर व्यवसायांच्या दुकानांना मात्र संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी दिली असल्याने या व्यावसायिकांना अजूनही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे या व्यासायिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून वाढीव वेळ मिळावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, ‘पुणे महापालिका हद्दीतील ज्या व्यवसायांना सायं ७ पर्यंतची वेळ देण्यात आली होती, ती आता रात्री ९ पर्यंत वाढवण्यात यावी, या संदर्भातील सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे. या संदर्भातील आदेश लवकर निर्गमित होतील. ‘ अशी माहिती दिली आहे.
पुणे महापालिका हद्दीतील ज्या व्यवसायांना सायं ७ पर्यंतची वेळ देण्यात आली होती, ती आता रात्री ९ पर्यंत वाढवण्यात यावी, या संदर्भातील सूचना महापालिका आयुक्तांना आज केली आहे. या संदर्भातील आदेश लवकर निर्गमित होतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 8, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाबत देवस्थान समितीने घेतला मोठा निर्णय!
- माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत
- प्रकाश आंबेडकर यांचे ते वक्तव्य हे छत्रपती घराण्याच्या व बहूजन समाजाच्या भावना दुखावणारे
- #मराठा_आरक्षण : गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, संभाजीराजेंचा आक्रमक इशारा
- तलवार कुणा विरोधात उपसणार? मंत्री विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल


