Share

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबाबत देवस्थान समितीने घेतला मोठा निर्णय!

Published On: 

कोल्हापूर : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसात सिनेमागृहे देखील सुरु करण्यात येतील मात्र राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवरात्रोत्सव देखील तोंडावर आला असून राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे लाखो भाविक भक्त दर्शन घेत असतात त्यामुळे होणाऱ्या उलाढालीवर तीर्थक्षेत्रातील व्यापारी व इतर घटकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट या उत्सवावर कायम असून व्यापाऱ्यांचा रोष आता वाढत आहे. राज्य सरकारने नियमावली जाहीर करून ही मंदिरे खुली करावीत अशी मागणी कोल्हापूरसह तुळजापूर, वणी, माहूर मधील व्यापारी करत आहेत.

मात्र, अशातच नवरात्रोत्सव काळात कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. परंपरेप्रमाणे नवरात्रौत्सवात सर्व विधी करण्यात येतील.  मंदिरात 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मात्र, नवरात्रौत्सव काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील. नवरात्रौत्सवात सर्व विधीचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल, अशी माहिती महेश जाधव यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!