Share

#मराठा_आरक्षण : गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, संभाजीराजेंचा आक्रमक इशारा

Published On: 

तुळजापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत असून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापूरातून सुरुवात करण्यात आली आहे. भवानी आईच्या दारात जागरण-गोंधळ करून आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

या आंदोलनाला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील हजेरी लावली असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे ‘1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार,’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

‘मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात सरकारचे प्रयत्न कमी पडत असून मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. तसंच सरकारमध्ये समन्वय नाही’ असा घणाघात देखील त्यांनी सरकारवर केला आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी मराठा-ओबीसी समाजात निर्माण केल्या जाणाऱ्या फुटीवर देखील भाष्य केलं आहे. ‘मराठा आणि ओबीसी समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको’ असं देखील सांगत समाजातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!