Share

तलवार कुणा विरोधात उपसणार? मंत्री विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत असून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापूरातून सुरुवात करण्यात आली आहे. भवानी आईच्या दारात जागरण-गोंधळ करून आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला आक्रमक इशारा दिला असून त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिप्रश्न केला आहे.

राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? असा प्रतिप्रश्न वडेट्टीवारांनी संभाजीराजेंना केला असून यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे. तसंच, ‘एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही. म्हणून राजांना सांगतो मध्य मार्ग काढता येतो. हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

गरज पडेल तेव्हा तलवारी काढू!

‘1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार,’ असं संभाजीराजे म्हणाले होते. तसेच गरज पडल्यास तलवारी काढू असा आक्रमक इशारा देखील त्यांनी दिला होता.

MPSC परीक्षांवर तोडगा नाहीच!

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावर्षी मागणी मराठा समाजातील नेते करत आहेत. तर, मेगा पोलीस भरती व राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलाव्यात अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. तर काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संभाजीराजेंसह, मंत्री अशोक चव्हाण, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे व मराठा समन्वयक उपस्थित होते. मात्र या बैठकीत देखील एमपीएससी परीक्षांवर ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थी देखील संभ्रमात आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!