कागल – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत. मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
छत्रपती शाहू महाराज , श्रीमंत पिराजीराव घाटगे महाराज, छत्रपती राजाराम महाराज ,व घटनाकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपसातील संबंध पाहता ऍड . प्रकाश आंबेडकर यांचे ते वक्तव्य हे छत्रपती घराण्याच्या व बहूजन समाजाच्या भावना दुखावण्या सारखे आहे. त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. यापुढे त्यांनी अशी विधाने करताना गांभीर्याने विचार करावयास हवा असे मत छ. शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यावर बोलताना आपल्या वारसांवर जे संस्कार आहेत. त्याची जाणीव ठेवून बहुजन समाज एकजूट राखून त्यांच्या मध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणे. ही जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे असे मत घाटगे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते विशेष ऋणानुबंधाचे होते.हेच ऋणानुबंध गेल्या तीन पिढ्यांमध्ये बहूजन समाज सामाजिक एकात्मतेच्या भावनेने जोपासत आहे. अशा परिस्थितीमध्ये बहूजन समाज एकसंघ राहील. हे ऍड आंबेडकर यांनी अशी विधाने करण्यापूर्वी हे जाणणे अपेक्षित आहे.याबाबतीत त्यांनी आपले मत जाहीरपणे व्यक्त करण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. याऊलट त्यांनी दोन्ही घराण्यांमधील सलोख्याचे संबंध अबाधित राखून सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश द्यावयास हवा होता असेही घाटगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोना संकटावर मात करणे शक्य
- लेखिकेच्या २० तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश, मुजोर ज्वेलर्सने मराठीत मागितली माफी
- …म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला
- मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे; कुणी अपमान करत असेल तर …
- ‘आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल’


