Share

कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

Published On: 

नांदेड : जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गोगदरी गावातील शेतकरी उत्तम कल्याणकर यांनी आर्थिक विवंचनेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अवघी अडीच एकर जमीन असलेला हा शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने त्रस्त होता.  बँक पीककर्ज देत नसल्याने प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्यानेच आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने भगव्या वस्रानेच गळफास लावून घेत आपले जिवन संपवले. बँकेत वारंवार कर्जाची मागणी करुनही बँक अधिकारी वेगवेगळे कारणे दाखवून कर्ज नाकारत होते. सदरील बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत शेतकऱ्याच्या पत्नीने केली आहे. सदरील बँक अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

विशेष म्हणजे २०२० या वर्षभरात नांदेड जिल्ह्यात एकूण १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवीले आहे.

कर्जमाफीचा घोळ कायम, पीककर्ज मिळेना

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी २ लाखापर्यंतची कर्जमाफी केली. परंतु, या कर्जमाफीत अनेक अटी असल्याने निम्याहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे पुर्णगठण केले होते, त्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. वंचित शेतकऱ्यांसाठी सेटलमेंट योजना सुरु केली मात्र बँक अधिकारी मनमानी पद्धतीने आकडे ठरवत असल्याने त्याकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, या मुळे अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले नाही.

निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण १२२ शेतकऱ्यांनी नापिकीच्या कारणामुळे आत्महत्या केली आहे. त्यापैकी अनेकांना मदत मिळाली असली तरीही अनेक प्रकरणे अजूनही चौकशीवरच आहेत. शासन पातळीवर वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस सुरू असला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!