नवी दिल्ली : 1 नोव्हेंबर पासून बँकांच्या संदर्भात अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये बँक व्यवहारावर लागू करण्यात येणारे शुल्क, बँकांच्या बदललेल्या वेळा यांचा समावेश आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी 1 नोव्हेंबरपासून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल करंट अकाउंट, ओवरड्राफ्ट अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट आणि इतर अकाउंट्ससाठी कॅश जमा आणि काढण्यासाठी सर्व्हिस चार्ज आणि चेकबुक संबंधित होते. .
मात्र यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या रोख रक्कम काढणे व जमा करणे यांसह विविध सेवांवरील शुल्कात वाढ केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. परिणामी बँक ऑफ बडोदाने लागू केलेली शुल्कवाढ एकाच दिवसात मागे घेतानाच, खातेदारांना आता महिन्याला कितीही वेळा रोख रक्कम काढता वा जमा करता येईल, असे जाहीर करावे लागले.
कोविडमुळे सरकारी बँका आता कोणतेही वाढीव सेवा शुल्क लागू करणार नाहीत, असे केंद्रीय अर्थ खात्याने स्पष्ट केले. सुमारे ४१.१३ कोटी जन धन खात्यासह सरकारी बँकांच्या ६०.०४ कोटी मूळ बचत बँक ठेव खात्यांकरिता वाढीव सेवा शुल्क नसेल, असे नमूद करण्यात आले. सेवा शुल्क आकारण्याचा बँकांपुढील मार्ग मात्र कायम आहे. स्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने, विहित मुदतीनंतर खात्यात रोख रक्कम काढणे अथवा जमा करणे यावर खातेदाराला वाढीव शुल्क लागेल, असे रविवारी, १ नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. यापूर्वी, नियमित बचत खाते, चालू तसेच रोख पत खाते आदींसाठी महिन्याला रोख रक्कम काढणे वा जमा करणे यासाठीचे महिन्यातील मोफत पाच व्यवहार तीनपर्यंत आणून ठेवले होते.
करोना साथीनंतर लागू झालेली टाळेबंदी शिथिल होत असतानाच, दरम्यानच्या कालावधीतील खातेदारांची अर्थस्थिती सुरळीत होत असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेतील रोखीच्या व्यवहारावरील शुल्कभाराने चिंता पसरली होती. बँका, वित्तसंस्था या टाळेबंदी निर्बंधातून मुक्त राहिल्याने नोटाबंदी कालावधीच्या तुलनेत ग्राहकांना दिलासा मिळाला. तर आता वाढीव सेवा शुल्क रद्द झाल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- ‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
