मुंबई : गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावी लागली. या स्पर्धेत काही खेळाडुंना कोरोनाची लागण झाली होती. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ढाका प्रीमीअर लिग स्पर्धेतील एका खेळाडुने बायोबबलचे उल्लंघन केले आहे.
या प्रकरणात बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरु केली आहे. यासह ढाका शहरातील महानगर क्रिकेट समितीने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात बांग्लादेश संघाचा दिग्गज अष्टपैलु खेळाडु शाकिब अस हसनचे नाव समोर आले आहे. ढाका महानगर क्रिकेट समितीचे अध्यक्ष्य या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाले की,’आमच्यासाठी आमचा संघ आधिकारी आणि खेळाडु यांची सुरक्षा महत्वाची आहे. या घटनेला आम्ही गांभीर्याने घेतले असुन या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी प्रयत्न करु’ असे ते म्हणाले.
ढाका शहरातील शेर ए बांग्ला या मैदानावर काही खेळाडु सराव करत होते. यावेळी सराव करत असलेला बांग्लादेशचा दिग्गज अष्टपैलु खेळाडु शाकिब अस हसन सराव करत असताना बाहेरील एका व्यक्तीने मैदानात प्रवेश केला होता. याआधी भारतात आयपीएल स्पर्धेदरम्यान बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यावेळी केरेआरच्या दोन खेळाडुंना कोरोनाची लागण झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयने तत्काळ बैठक बोलावुन आयपीएल स्पर्धा स्थगित केल्याची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वात ‘या’ जिल्ह्यात तिसरा मोर्चा निघणार?
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे : नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

