Share

पर्यावरण समतोल राखण्यासाठी बांबू लागवड करणे गरजे – डॉ.यज्ञवीर कवडे

Published On: 

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील टेकडी तांडा व शेकटा व तोंडीळी या गावामध्ये लिपॉक सोशल फाउंडेशन या संस्थेच्या मुख्य आयोजनातून ‘बांबू लागवड आणि त्यावरील अनुदान’ या महत्वपूर्ण विषया संदर्भात शेतकरी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकिसाठी एमआयटी औरंगाबादचे संस्थापक अध्यक्ष यज्ञवीर कवडे, प्रो.प्रशांत अवसरमल त्यासोबतच लिपॉक सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जॉय डॅनियल व त्यांची टीम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये यज्ञवीर कवडे यांनी बांबू लागवडीचे महत्त्व, पर्यावरण रक्षण, शेती, बांधकाम, ऊर्जा, अशा विविध क्षेत्रांत बांबूचा जागतिक वापर, शेतकNयाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू एक महत्वाचा घटक बांबूच्या झाडाचे महत्व व त्यापासून होणारे उत्पन्न लक्षात घेऊन शेतक-यांनी मान्सूनच्या काळात जुन-जुलै महिन्यात बांबूची लागवड करावी. बांबूला जास्त पाण्याची गरज भासत नसल्याने आणि बांबूचे जिवनचक्र ५० वर्षापर्यंत असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.

सोबत अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे सामथ्र्य बांबूत आहे. याबद्दल यज्ञवीर कवळे सरांनी अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. उत्पन्नबद्दल ते म्हणाले की बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. म्हणून प्रत्येक शेतकNयांनी किमान १०० झाडे तरी लावावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतक-यांना केले. या आढावा बैठकीत सरपंच सुनिल राठोड, सरपंच तोंडोळी संजय गरड, अरुण गरड, अरुण कल्याण तांबे, रामचंद्र तांबे, गणेश वाघचौरे, कल्याण शेळके, शांतीलाल राठोड, सुरेश राठोड, किशोर शेळके, विजय शेळकेसह शेतकरी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!