मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेने भाजप सोबतची असलेली युती तोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल. तेव्हापासून भाजप हे शिवसेनेचे हिंदुत्व सोडून दिल असा आरोप सातत्त्याने करत असतात. असेच आरोप अर्थसंकल्प अधिवेशनात देखील विरोधकांनी केलेले होते.
याच पार्श्वभूमीवर या आरोपांची परतफेड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणात व्याजासकट केलेली आहे असे म्हणले तर अतिशयोक्तीठ रणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.
अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हिंदुत्व, बाबरी मशीद, शर्जील उस्मान, काश्मीर पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून ते युती तुटण्यापर्यंतच्या मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट निर्लज्जच संबोधलं. मुख्यमंत्र्यांचं हे रौद्ररुप पाहून भाजप सदस्यही चिडीचूप होते.
‘बाळासाहेबांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं हिंदुत्व शेंडी जाणव्यांचं नव्हतं’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.
२०१४ मध्ये आपली युती तुटली तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार आहे, अशी गर्जना करतानाच मला हिंदुत्व शिकवू नका, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारला जवळ केलं. रामविलास पासवानांना मांडीवर घेतलं हेच का तुमचं हिंदुत्व? शर्जिल उस्मानी उत्तर प्रदेशचं प्रोडक्ट्स आहे, आमचं नाही, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- ‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

