नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्व जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. कारण त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धात जग पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी जगाने एक कुटुंब म्हणून राहायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
“जगात शांतता नांदावी अशी आमची इच्छा आहे. जगाने एक कुटुंब म्हणून राहायला हवे आणि प्रत्येक देशाने स्वतःच्या सीमेत शांततेने रहावे. इतर देशांशी शांतता आणि निरोगी संबंध राखण्यावर भारताचा नेहमीच विश्वास आहे.”, असे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान युक्रेनमध्ये भारताचे तब्बल ३० हजार नागरिक अडकले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारताकडून ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवली जात आहे. ज्याद्वारे आतापर्यंत ९०० हून अधिक भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- केव्हिन पीटरसनने शेअर केली युक्रेनहून पोलंडला गेलेल्या कुटुंबावर उपडेट; पोलंड सरकारचे मानले आभार
- “सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
- पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

