मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठानं मराठा आरक्षण खटला पाच सदस्यीय खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय देताना आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं राज्यात मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे राज्य सरकारनं यासंर्दभात बैठक घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पक्षीयांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्या करिता राज्य सरकार सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे, ही वस्तूस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सामोर जावं लागणार आहे. सध्या राजकारण न करता हा मराठा आरक्षण मुद्दा हाताळायचा आहे.
काही विषय महाराष्ट्रातले दोन्ही पक्षांनी मिळून सोडवले पाहिजेत त्यातील मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. असं राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मत मांडलं. तर कंगणा मुंबईला सोनिया सेना म्हणाली, त्यावर विचारलं असता या विषयावर न बोल्लेलचं चांगलं आहे. असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिलं.
पहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/336461044358786/
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रात आमचा उपमुख्यमंत्री नाही, याची खंत आहेच…
- सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- मागील १५ वर्षात झाली नाहीत इतकी विकासकामे आगामी पाच वर्षांत करणार- निलेश लंके
- उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना हवी आहे भाटगिरी,चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
- ‘कंगना राणावत’ हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

