अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात मागील १५ वर्ष शिवसेनेचे आमदार होते. मागील १५ वर्षात मतदारसंघात झाली नसतील इतकी विकास कामे आगामी पाच वर्षात मार्गी लावणार असल्याचे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. तसेच तालुक्याच्या विकासाचा पहिल्या टप्प्यातील ८५ कोटींचा विकास आराखडा आपल्याकडे तयार असल्याचे आ.लंके यांनी सांगितले आहे.
आ.लंके म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात मी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. येणाऱ्या काळात मतदारसंघात विकासकामे होतीलच त्याची चिंता करू नका, सध्या तालुक्यातील जनतेला कोरोनाच्या महामारीच्या संकटात मदत करणे महत्त्वाचे आहे, असे लंके म्हणाले. तालुक्यातील निघोज व परिसरातील सव्वा कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी निघोज गावचे सरपंच ठकारामशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, माजी सभापती सुदाम पवार, वनकुटे गावचे सरपंच अॅड.राहुल झावरे, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, निघोजचे उपसरपंच बाबाजी लंके, सोमनाथ वरखडे, चंद्रकांत लंके, विश्वास शेटे, सोहेल मोमीन, सुदर्शन वरखडे, विकास शेटे, युवा नेते बाळासाहेब लंके आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- महाराष्ट्रात आमचा उपमुख्यमंत्री नाही, याची खंत आहेच…
- कुडाळ शहर पुन्हा एकदा लॉकडाउन; कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय
- फडणवीस सरकारने घेतलेले शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय ठाकरे सरकारने स्थगित केले – अनिल बोंडे
- ‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
- लॉकडाऊनला विरोध करत पालकमंत्री म्हणाले मृत्यूदर घटवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

