नवी दिल्ली : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असं म्हणत अंतरिम जामीन नाकारला होता. तर, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत दिलासा दिला होता.
मात्र, आता अर्णबला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करणे आणि तपास सीबीआयकडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. ही याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी आहे. मात्र ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे. रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करण्यात यावेत आणि हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात यावे असे याचिकेत म्हटले गेले होते. या व्यतिरिक्त संपादकीय विभागातील कोणीही, तसेच इतरही कोणत्या कर्मचाऱ्याला अटक होता कामा नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिलं आहे.
अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
४ डिसेंबर रोजी रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामीसह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत. महिन्याभरापूर्वी याप्रकरणी मुंबईतील अर्णबच्या निवासस्थानी मुंबई व रायगड पोलीस चौकशीसाठी घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा’
- काही पक्षांना राजकीय स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय; मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला!
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- …म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

