मुंबई : अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट त्या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. नुकतीच या चित्रपटाच्या हिंदी रीमेकची घोषणादेखील झाली होती.
‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या हिंदीतील ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर आता ‘मुळशी पॅटर्न’ आणखी तीन दाक्षिणात्य भाषांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा स्वतः प्रवीण तरडे सांभाळणार आहेत.
ज्या शेतकर्यांनी आपली जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकली आणि त्यांना बचतीची माहिती नसल्यामुळे लवकरच दारिद्र्यात ढकलले गेले अशा शेतकऱ्यांसमोर भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. गुन्हेगारी विश्वात सक्रिय असलेल्या कुटुंबातील तरुण पिढीविषयीही यात भाष्य केले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा’
- काही पक्षांना राजकीय स्मृतीभ्रंशाचा आजार झालाय; मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला!
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- …म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

