Share

पक्ष अडचणीत असताना मी इतरांसारखा पळून गेलो नाही, थोरातांचा विखेंना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अशाच एका प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या राधाकृष विखेंला टोला लगावला आहे. त्यांनी पक्ष अडचणीत असताना मी इतरांसारखा पळून गेलो नाही असं विधान केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पुढे बोलताना काँग्रेस पक्ष अडचणीत असताना मी इतरांसारखा पळून गेलो नाही, तर बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत असा म्हणत अप्रत्यक्षपणे विखेंवर टीका केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी पाच वर्षातले हे अपयशी सरकार आहे. भटकावणाऱ्या मुद्दयावर जनता आता विश्वास ठेवणार नाही. भावनिक मुद्दयावर लोकसभा निवडणुकीत फायदही झाला असेल मात्र विधानसभा निवडणुका स्थानिक प्रश्नांशी निगडीत असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. जनता आता फसणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसच्या प्रचाराविषयी बोलताना सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील. ज्योतीरादीत्य शिंदे , सचिन पायलट यांचीही मागणी होत आहे. अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधीनाही आम्ही आमंत्रित करत आहोत अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181786723438587904?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181781304339120128?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!