Share

गुढी पाडव्यानिमीत्त मुंबई इंडियन्सच्या खास शुभेच्छा

Published On: 

चेन्नई : आयपीएलमधील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आरसीबी संघाने पराभुत केले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना हा १३ एप्रिल रोजी चेन्नई येथे होत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी जोरदार तयारी करत आहे. सामन्याच्या दिवशीच गुढी पाडवा असल्याने चाहत्यांना मुंबईच्या संघाकडून विजयाच्या गुढीची अपेक्षा आहे.

याच पार्श्वभुमीवर मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यासाठी गुढी पाडव्यानिमीत्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबईचे विविध खेळाडू हे मराठीत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत. या व्हिडीओत धवल कुलकर्णी, आदित्य तारे, माजी क्रिकेटपटू जहीर खान, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि अर्जुन तेंडुलकर हे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत.

https://www.instagram.com/p/CNlxyyvpnYh/

या व्हिडीओत प्रत्येक खेळाडू मराठीत शुभेच्छा देत आपला आवडता पदार्थ सांगत आहे. यात अर्जुन तेंडुलकरने या व्हिडीओत त्याला पेढे खुप आवडतात असे सांगितले आहे आणि तसेच हे पेढे चाहत्यांनाही भरपुर खाण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत विजयाची गुढी उभारेल का याची चाहत्याना उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!