उस्मानाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, रुग्णसंख्येत ही वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढील काही दिवसात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तळीरामांनी दारूच्या दुकानात एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. ही गर्दी उस्मानाबाद शहरातील प्रमुख चौकात देान्ही दुकानांसमोर झाली होती. चार ते पाच तास ही गर्दी होती. विशेष म्हणजे या ठिकाणी नियमावलीही पाळली गेली नाही. शहरात एकीकडे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे, असे असले तरी काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
उस्मानाबाद शहरातील एका चौकात दारू दुकानांसमोर कोराेना नियमांची पायमल्ली होत असताना दुसऱ्या भागात कोरोनाच्या संसर्गामुळे तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या या मृतदेहांवर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. कपिलधार स्मशानभूमीत १२ व अन्य दाेन धर्मातील रीतिरिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आले. विशेष म्हणजे आता अंत्यविधी लवकर व्हावेत, यासाठी मृतांचे नातेवाइक प्रतीक्षेत असून, त्यासाठी अधिकारी, लाेकप्रतिनिधींना फाेन करत आहेत.
दरम्यान, साठवणुकीच्या प्रकारामुळे काळ्याबाजार करणाऱ्यांना मुभा मिळणार आहे. जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आलेले आहे, त्यात लॉकडाऊनमुळे दारूची साठवणूक झाल्यास मोठ्या प्रमाणावर काळा बाजारी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासनाला आणि पोलिसांना सतर्क राहावे लागणार हे नक्की.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे

