🕒 1 min read
तळेगाव दाभाडे : मावळ विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उमेदवारांच्या फेऱ्या चांगल्याचं वाढल्या आहेत. भाजपचे उमेदवार संजय बाळा भेगडे यांनी तर गावनिहाय प्रचार करत मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात बाळा भेगडेंचे जंगी स्वागत होत असल्याचं दिसत आहे. मंगळवारी बाळा भेगडे यांनी नाणे मावळ मधील गावांना भेट दिली. यावेळी नागरिकांनी बाळा भेगडेंचे जंगी स्वागत करत आपला पाठींबा दर्शवला.
बाळा भेगडे यांनी या सर्व गावातील नागरिकांचा मान – पान स्वीकारत गावकऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. तसेच स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या कल्याणकारी योजना जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे त्या यावेळी म्हणाले.पाथरगाव, पिंपोळी, ताजे, बोरज, पाटण, भाजे, मळवली, देवले, औंढोली, औंढे या गावांना बाळा भेगडे यांनी भेट दिली.
मावळ मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई पाहिला मिळणार आहे. विद्यमान आ. बाळा भेगडे यांचा विरोधात त्यांच्याच सहकारी सुनील शेळके काँग्रेस आघाडीच्या तिकिटावर लढणार आहे. दोन्ही तगडे उमेदवार असल्याने मावळात यंदा हायव्होल्टेज लढत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835275275649034?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
